मांजरा कारखान्यातून आता दररोज आठ मॅट्रिक टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती : माजी मंत्री चेअरमन दिलीपराव देशमुख

लातूर : राज्यातील सहकार क्षेत्रांत नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात ८ टीपीडी क्षमतेच्या म्हणजे आठ मेट्रिक टन प्रति दिवस कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी उत्साहात पार पडला. मांजरा कारखान्यातून आता दररोज आठ मॅट्रिक टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मिती होणार आहे.

यावेळी दिलीपराव देशमुख म्हणाले की, मांजरा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. ऊस तोडणीचे १०० टक्के हार्वेस्टरद्वारे नियोजन करून कारखान्याने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिलेल्या विचारधारेचा मार्गदर्शक ठेऊन मांजरा परिवाराची वाटचाल सुरू आहे. सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले असून, कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत, असे सांगून भविष्यात अधिकपणे चांगल काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे यांनी प्रास्ताविकात चालू गळीत हंगामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, अनंतराव ठाकूर-देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, किरण जाधव, सचिन बंडापल्ले, बाळासाहेब कदम, प्रमोद जाधव (व्हाईस चेअरमन, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), सचिन पाटील (उपाध्यक्ष, संत शिरोमनी मारुती महाराज कारखाना), अ‍ॅड. प्रविण पाटील (उपाध्यक्ष, रेणा कारखाना) श्रीकांत बैले (पंचायत समिती सभापती), महेश चव्हाण (उपसभापती) अनिलराज पिसे (राज प्रोसेसचे एमडी) आदींसह कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन सुर्यवंशी यांनी केले. आभार कैलास पाटील यांनी मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here