कोल्हापूर : अथर्व शुगर्स-कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा, तीन महिन्यांचे वेतन तीन दिवसांत देण्याचा निर्णय

कोल्हापूर : दौलत साखर कारखाना ‘अथर्व’ कडून चालवला जात असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये कामगार संघटना, व्यवस्थापनामध्ये झालेल्या बैठकीत वेतन करार करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. वेतन कराराच्या मुद्द्यावर कामगार संघटना सकारात्मक असून, सहमतीने केले जाईल त्यासाठी आधी वेतन अदा करा, अशी संघटनांनी मागणी होती. त्यावर तोडगा न निघाल्याने ७ कामगार उपोषणाला बसले होते. अखेर बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी व्यवस्थापन व कामगार संघटनांची बैठक घेतली. यावेळी कामगारांचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांचे वेतन पुढील तीन-चार दिवसांत अदा करण्यास बुधवारी अर्थव शुगर्सचे मानसिंग खोराटे यांनी तयारी दाखविली. तर पगार जमा झाल्यावर आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका कामगारांनी घेतली.

कामगारांचे नेते उदय नारकर व विजय देवणे यांनी कारखाना कार्यस्थळावर उपोषणास बसलेल्या कामगारांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीतील निर्णय सांगितला. त्यांनी तोंडी आश्वासनावर उपोषण मागे घेण्यास नकार दिला. कामगारांचा पगार खात्यावर जमा झाल्यावरच उपोषण मागे घेऊ, असा निर्धार त्यांनी केल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे देवणे यांनी रात्री उशिरा सांगितले. मात्र, कामगारांकडून वेतन करार झाला नसल्याने संबंधीत बँकेने कारखान्याला केला जाणारा कर्जपुरवठा थांबविला आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, धीरज जाधव, ‘अथर्व’चे मानसिंग खोराटे, आप्पासाहेब चौगुले, उदय नारकर, विजय देवणे आदी उपस्थित होते. वेतन करारास कामगार संघटनांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here