गुजरातमधील नवसारीच्या गणदेवी साखर कारखान्याने दिला, देशात सर्वाधिक ४,७०१ रुपये ऊस दर

सांगली : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील श्री सहकारी खांड उद्योग लि., गणदेवी या साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखानापोहोच प्रतिटन ४,७०१ रुपये, असा सर्वोच्च दर जाहीर केला आहे. देशात गणदेवी कारखाना ऊस दर उच्चांकी उत्तम दर देत आला आहे. दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील उसाचा १२.५० टक्केपेक्षा जास्त साखर उतारा असतानाही सहकारसम्राटांच्या ताब्यातील व खासगी कारखाने ऊसदर देण्यात मागे पडले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांनी केली आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध बातमीत म्हटले आहे कि, गणदेवी कारखान्याने हंगामात ७ लाख १ हजार ६८५ टन उसाचे गाळप करत, ८ लाख १५ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचा या हंगामाचा सरासरी साखर उतारा हा ११.६३ टक्के इतका राहिला आहे. कारखान्याने दिलेला ४७०१ रुपये ऊस दर देशातील सर्वाधिक दर ठरला.गेली दोन दशके या साखर कारखान्याने देशात सर्वोत्तम ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली. इतकेच नव्हे, तर गुजरातमधील इतरही सहकारी साखर कारखाने तेथील शेतकऱ्यांना असाच चांगला दर देत असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात कारखानदारांकडून वर्षानुवर्षे ही लूट चालू आहे असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात काही कारखान्यांनी प्रतिटन ३५०० रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण केली असा आरोप त्यांनी केला. कमी उतारा असूनही गुजरातमधील बार्डोली साखर कारखान्याने ३६७२ ते ३८७२ रुपये, कामरेज येथील कारखान्याने ३७२५ ते ३९२५ रुपये, सायन कारखान्याने ३६७६ ते ३८३१ रुपये, मढी कारखान्याने ३५१२ ते ३६१२ रुपये असा दर दिल्याचे कोले यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here