सोलापूर : बेल्जियमच्या तज्ज्ञांकडून जकराया कारखान्याच्या बायोगॅस प्लांटची पाहणी

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगरच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटला (सीबीजी) बेल्जियम देशातील तज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये बेल्जियममधील कंपनीचे ग्लोबल प्रोजेक्ट मॅनेजर क्रिस वॅन कम्फोर्ट, ग्लोबल बिझनेस लीड बायोगॅसचे हँडन सिलिंगिर यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान मान्यवरांनी प्लॅन्टमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया तसेच संपूर्ण प्रकल्पाचे सुयोग्य नियोजन पाहून समाधान व्यक्त केले.

या बायोगॅस प्लांटची केलेली बारकाईने आखणी, व्यवस्थापनाची शिस्त आणि कार्यक्षम अंमलबजावणी यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविताना जकराया शुगरने घेतलेल्या खबरदारीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कंपनीचे पुणे येथील अॅटलास कॉपको कंपनीचे अधिकारी योगेश करवीर (प्रॉडक्ट मॅनेजर), विनोद पवार (प्रॉडक्ट स्पेशालिस्ट), जावेद तांबोळी (क्वालिटी मॅनेजर) आणि अपूर्वा आंधळे (सी.टी.एस. मॅनेजर) यांनीही उपस्थित राहून प्लॅन्टची सविस्तर पाहणी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here