जकार्ता : इंडोनेशियातील अन्न आणि पेय कंपन्यांना येत्या दोन वर्षांत मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांवर रंगावर आधारित लेबल लावणे बंधनकारक असेल. आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक नवीन आदेश जारी केल्याचे ‘रॉयटर्स’च्या वृत्तामध्ये म्हटले आहे. लठ्ठपणा आणि इतर आरोग्य धोक्यांना तोंड देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. २०२५ मध्ये हे लेबलिंग नियम लागू करण्याच्या योजनांबद्दल ‘रॉयटर्स’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते.
१४ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका मंत्रालयीन आदेशात, इंडोनेशियाने अधिकृतपणे ‘ट्रॅफिक-लाइट’ “पोषण पातळी” प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये चरबी, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांसाठी लाल लेबल आणि कमी प्रमाण असलेल्या उत्पादनांसाठी हिरवे लेबल असतील. याबातच्या अध्यादेशात असे नमूद केले आहे की, सरकारी प्रयोगशाळांच्या चाचणी निकालांच्या आधारे कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर संबंधित रंगांचे स्टिकर्स मुक्तपणे लावू शकतात. हे नियम दोन वर्षांत बंधनकारक होतील, मात्र याचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवरील कारवाईबद्दल कोणताही तपशील दिलेला नाही. तयार उत्पादने विकणाऱ्या दुकानांनी त्यांच्या मेनूवर हे स्टिकर्स प्रदर्शित केले पाहिजेत, असेही या आदेशात अनिवार्य केले आहे.


















