कर्नाटक : पांडेगाव-अथणी येथे आज सुप्रीम शुगर्स’चे भूमिपूजन

सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व तरुणांच्या भवितव्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळीपासून काही अंतरावर असलेल्या पांडेगाव (ता. अथणी) येथे सुप्रीम शुगर्स साखर कारखान्याची उभारणी केली जात आहे. शनिवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘सुप्रीम शुगर्स’चे अध्यक्ष राजवर्धन घोरपडे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला गुरुशिवलिंग शिवाचार्य स्वामी (बेळंकी), आनंदगिरी महाराज (देशिंग), कैलास भारती ऊर्फ बाळ महाराज (गिरलिंग देवस्थान), श्रीधामजी महाराज (लिंगनूर), शिवयोगी सिद्धलिंग महाराज (गौसिद्ध) व कोंडिबा महाराज (शिरूर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री श्रीमंत पाटील, आमदार राजू कागे, आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मनोज शिंदे-म्हैसाळकर, सत्यजितसिंह पाटणकर, जयसिंग शेंडगे, दिग्विजय देसाई, कऱ्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे, अनिता सगरे, शिवाजीराव वाघ, जिल्हा परिषद सभापती स्नेहल मोरे व सदस्य सुजाता पाटील उपस्थित राहणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here