सातारा : सह्याद्री कारखान्याकडे २३ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद, ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ

सातारा: सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने मागील २०२५-२६ या गळीत हंगामात प्रतिदिन ७५०० मेट्रिक टनावरून ११ हजार मेट्रिक टनाचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केला आहे. आता दैनंदिन गाळप क्षमतेस पुरेल अशा प्रकारची ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.या हंगामासाठी कारखान्याकडे २३ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून, या नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गळीत करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची तयारी करण्यात येत आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ करण्यात आला.

कारखान्याच्यावतीने बैलगाड्या, ट्रॅक्टर गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर आणि ऊसनतोडणी मशिन यांच्याशी करार करण्यात येत आहेत. कारखान्याचे सभासद, कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे, शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, नितीन साळुंखे, संजय चव्हाण, ऊस वाहतूक वाहन मालक संग्राम भोसले, हणमंत ऊर्फ मंगेश पाटील, नितीन कदम, बाळासाहेब बजबळे, जयवंत घाडगे, मशिन मालक हिंदुराव यादव, गजानन देशमुख, ताजुद्दीन मुल्ला, अशोकराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, ऊस तोडणी कंत्राटदार, कर्मचारी आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here