कोल्हापूर : बिद्री, वारणा, भोगावतीला एनसीडीसीकडून कर्ज मंजूर, थकीत ऊस बिलांचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : जिल्ह्यातील भोगावती, बिद्री आणि वारणा या तीन सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) कर्ज मंजूर झाले आहे. यापैकी दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) साखर कारखान्याला २६१ कोटी ८० लाख रुपये, वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याला १६० कोटी रुपये आणि भोगावती कारखान्याला ११४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केल्याचा फायदा राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या भोगावती कारखान्याला झाला आहे. एनसीडीसीकडून कारखान्यास कर्ज मंजूर झाले असून, त्यातून शेतकऱ्यांची ऊसबिले प्राधान्याने भागविण्याचा प्रयत्न आहे, असे कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी सांगितले.

भोगावती कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत झाला आहे. कारखान्याची एफआरपी थकीत नाही आणि ताळेबंद उणे नेटवर्थमध्ये नसल्याचे दाखवण्यात यश आले आहे. ‘भोगावती’ने या हंगामात गाळप केलेल्या ४.३२ लाख टनपैकी १६ ते ३१ डिसेंबर २०२५ अखेरचीच एफआरपी दिली. नंतरची सुमारे ८० कोटींची बिले थकीत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून मंजूर कर्जाची रक्कम जिल्हा बँकेकडे भरावी लागेल. त्यातून बँकेचे कर्ज भागवून बँक कारखान्यास वाढवून कर्ज मंजूर करील व त्यातून ही बिले भागवली जातील. राज्य सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या १४ कारखान्यांचे प्रस्ताव मदतीसाठी महामंडळाकडे पाठविले होते, त्यांतील सात कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यात या तीन कारखान्यांचा समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here