ऊस नियंत्रण आदेश २०२६ : इथेनॉलला ‘साखरे’चा दर्जा; २० मेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना हरकती मागवल्या

कोल्हापूर : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जुना १९६६ पासून अस्तित्वात असलेला ‘ऊस नियंत्रण आदेश’ रद्द करून त्या जागी नवा ‘ऊस नियंत्रण आदेश २०२६’ आणला जाणार आहे. या मसुद्यात पहिल्यांदाच इथेनॉलला साखरेप्रमाणेच अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. आता उसाचा रस, सिरप आणि मळी यांनाही या नियंत्रण व्यवस्थेचा हिस्सा मानले जाईल. आता ६०० लिटर इथेनॉल हे १ टन साखरेच्या बरोबरीचे मानले जाईल. त्यामुळे कारखान्यांना आता ‘बायो-एनर्जी हब’ म्हणून पाहिले जाईल. त्यामुळे कारखान्यांचे उत्पन्न वाढेल. उसाचे गाळप न करणाऱ्या स्वतंत्र इथेनॉल युनिट्सना परफॉर्मन्स बैंक गॅरंटीपासून सूट देण्यात आली आहे.

नव्या कायद्याने साखर उद्योगाचे नियम अधिक कडक होतील. मसुद्यावर २० मेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, तर त्यांना थकबाकीवर १५ टक्के वार्षिक दराने व्याज देण्याचा नियम कायम आहे. देय रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकारी ही रक्कम ‘भूमी महसूल थकबाकी’ प्रमाणे वसूल करू शकतील. उसाची एफआरपी ठरवताना आता केवळ साखरेची रिकव्हरी न बघता, उसाची मळी, चिपाड (बगॅस) आणि इथेनॉल अशा उप-उत्पादनांच्या मूल्याचाही विचार केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला अधिक चांगला भाव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here