नवी दिल्ली : निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार असल्याच्या बातम्या फेटाळून लावत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने त्या “फेक” असल्याचे म्हटले असून इंधन दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले.गुरुवारी ‘X’ वरील पोस्टमध्ये मंत्रालयाने म्हटले की, “पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत काही बातम्या प्रसारित होत आहेत. सरकारकडून अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार सुरू नाही,” असे स्पष्ट करण्यात येत आहे.या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “अशा बातम्या नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. त्या खोडसाळ आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.”
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती न वाढलेला भारत हा एकमेव देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम भारतीय नागरिकांवर होऊ नये यासाठी भारत सरकार आणि तेल सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने उपाययोजना केल्या आहेत.सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही मंत्रालयाने नागरिकांना केले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात मतदान संपल्यानंतर इंधन दरात बदल होऊ शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर ही स्पष्टीकरणात्मक भूमिका देण्यात आली. (ANI)















