इथेनॉलला जादा दराच्या मागणीसाठी साखर कारखान्यांनी एकत्र येण्याची गरज : माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांचे आवाहन

बेळगाव (कर्नाटक) : केंद्र सरकारने दुटप्पी धोरण अवलंबल्याने साखर कारखान्यांना वेठीस धरले जात आहेत. इथेनॉलला दर मिळाल्यास शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देता येतो. इथेनॉलला जास्त दर द्यावा यासाठी सर्व कारखान्यांनी केंद्रावर दबाव आणावा. यासाठी सर्व साखर कारखान्यांनी एक होऊन लढले पाहिजे, असे मत माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले. पांडेगाव (ता. अथणी) येथे सुप्रीम शुगर्स या कारखान्याचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. अथणी तालुक्यात एक लाख टन ऊस असून कोणत्याही कारखान्याला ऊस कमी पडत नाही. या कारखान्यासही ऊस कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री अजित घोरपडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, एकूण ८० एकरावर कारखाना उभारला जात असून २०२७ च्या गळीत हंगामामध्ये कारखाना सुरू होणार आहे. प्रतिदिन ४,५०० टन गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. तर आमदार सवदी यांनी अथणी तालुक्यात हा सातवा साखर कारखाना उभा होत आहे. हा कारखाना उभारण्यासानी कर्नाटक सरकारची मदत लागत असेल तर मी त्याला देण्यास सिद्ध आहे, असे सांगितले. यावेळी गुरुलिंग शिवाचार्य स्वामी, आनंद गिरी स्वामी, महादेव स्वामी, महान कैलास स्वामी, श्रीराम सिद्धलिंगेश्वर स्वामी, कोंडीबा महाराज, आमदार इद्रिस नायकवडी, दिग्विजय पवार देसाई, कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन घोरपडे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जयमालादेवी घोरपडे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी वाघ, संचालक अनिता सगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here