ऊसबिल न दिल्यास फौजदारी कारवाईची तरतूद करावी, कारखान्यांच्या विस्ताराला मर्यादा घालाव्यात: माजी खासदार राजू शेट्टी

सोलापूर : केंद्र सरकारने ऊस नियंत्रण आदेश १९६६ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवणारा मसुदा जाहीर केल्यानंतर, साखर उद्योग आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सध्याच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची थकबाकी वाढत आहे. त्यामुळे या सुधारणा केवळ दिखावा ठरणार नाहीत ना, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

‘त्या’ “कॉम्प्रेस्ड बायोगॅस”ला साखरेचा दर्जा द्यावा…

ChiniMandi WhatsApp Channel

ऊसबिल न दिल्यास फौजदारी कारवाईची तरतूद करावी, कारखान्यांच्या विस्ताराला मर्यादा घालाव्यात, ठरलेल्या कार्यक्षेत्राबाहेरून आणलेल्या उसाचा वाहतूक खर्च कारखान्यांनीच करावा, प्रेसमडपासून तयार होणाऱ्या “कॉम्प्रेस्ड बायोगॅस”ला साखरेचा दर्जा द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले कि, सुधारणा वरवर शेतकरी हिताच्या वाटत असल्या, तरी त्यांच्या कायदेशीर परिणामांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्या बाबी तपासून शेतकऱ्यांच्या गैरसोयीच्या तरतुदींना आम्ही विरोध करू. याप्रश्नी लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहोत.

मसुद्यातील काही महत्वाच्या तरतुदी अशा…

या मसुद्यात साखर कारखान्यांमध्ये किमान २५ किलोमीटर अंतर राखण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, खांडसरी युनिट्सना ऊस उत्पादकांना केंद्राने निश्चित केलेला “वाजवी व किफायतशीर दर” (एफआरपी) देणे बंधनकारक करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच खांडसरी उद्योगांना परवाना प्रणालीखाली आणून त्यांच्यावर नियमित तपासणी व नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न या मसुद्यात आहे. ऊस खरेदीनंतर १४ दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास १४ टक्के व्याज देण्याची अटही प्रस्तावित करण्यात आली आहे.

मसुद्यावर २० मेपर्यंत मागविले अभिप्राय…

देशात दरवर्षी सुमारे ४३५ दशलक्ष टन ऊस उत्पादन होते, त्यापैकी सुमारे ३१ टक्के ऊस गूळ व खांडसरी युनिट्समध्ये वापरला जातो. त्यामुळे या क्षेत्राचे नियमन अधिक मजबूत करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सुधारणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कितपत लाभदायी ठरतील, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या मसुद्यावर २० मेपर्यंत अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here