राज्यातील साखर उद्योगाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे शिष्टमंडळ नेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : राज्यात साखर कारखान्यांसमोरील अडचणी आणि कांदा उत्पादक प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऊस कारखाने आणि कांदाप्रश्नी एक शिष्टमंडळ केंद्राकडे नेऊन मदत मागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी (दि. २८ एप्रिल) बार्शी (जि. सोलापूर) येथे बोलत होते. फडणवीस म्हणाले कि, साखर कारखान्यांसमोर अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी सचिवस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीला यावेळच्या हंगामापुढे काय अडचणी आहेत? त्या अडचणींचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाईन. या शिष्टमंडळात विशेषतः ऊस आणि कांदा उत्पादकांचा समावेश असेल. केंद्राकडून काय मदत मिळू शकते का? हे पाहून यासंदर्भातील निर्णय होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

एफआरपी वाढत असताना साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढलेला नाही. यामुळे साखर कारखाने अडचणीत आले असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी साखर उद्योगाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी मुंबईत साखर उद्योगांसमोरील अडचणींवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी साखर उद्योगासमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्याकरिता समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here