धाराशीव : आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या नियोजनाखाली सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट नंबर १ या साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२६-२७ साठीचा रोलर पूजन समारंभ नुकताच झाला. राजेश शेळके व कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने रोलर पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर ठोंबरे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी गाळपास पुरेसा ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यावर्षीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन सज्ज झाले आहे. हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग आणि ओव्हरऑइलिंगची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केले. रोलर पूजन सोहळ्याला डिस्टिलरी मॅनेजर अजित भोसले, चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, शेती अधिकारी बापूसाहेब देशमुख, चिफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी, इलेक्ट्रिकल मॅनेजर उदयसिंह गडगे, दादा काळे, बाळासाहेब लांडगे, जीवन दाढे, आबा अनवणे, भैरू गरदाडे, बालाजी लोंढे, बाळासाहेब धुमाळ, सोमनाथ सूर्यवंशी, लक्ष्मण ढगे, संदीप कवठे, हरिदास ढगे, सुरेश साळुंके, जेजेराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


















