सांगली : हुतात्मा कारखान्यातील गैरकारभाराविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा किरण नायकवडींचा इशारा

सांगली: हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या व्यवहारांचा आकडा २६३८ कोटी रुपयांवर दिसत आहे. कारखान्यातील गैर कारभाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक धार आली असून, ‘आंदोलकांचा अंत पाहू नये, असा इशारा आंदोलनाचे नेते किरण नायकवडी यांनी दिला. वैभव यांनी गेल्या २० वर्षांत मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवला आहे. कारखाना ताब्यात देताना कोणतेही कर्ज नव्हते. त्यामुळे ते कर्ज भागवूनच कारखाना ताब्यात द्यावा, आम्हाला कारखाना चालवायचा आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी आंदोलनस्थळी प्रा. सुरेश होरे, अरुण यादव, वसंत वाजे, सनी अहिर, इसाक बलांडकर आदींची भाषणे झाली.

गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष नायकवडी यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, त्यांनी कारखान्यावर केलेले कर्ज भरावे व राजीनामा द्यावा, यासाठी शेतकरी व सभासदांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाने आता गती घेतली आहे. साखर संचालक कार्यालयातील बैठकीची माहिती देताना केदार नायकवडी म्हणाले की, या बैठकीला वैभव नायकवडी यांचे प्रतिनिधी, वकील, कार्यकारी संचालक तसेच सेक्रेटरी वीरधवल नायकवडी उपस्थित होते. त्यांनी तक्रार अहवाल व पंचनामा प्रत मिळालेली नसल्याचे सांगत एक महिन्याची मुदत मागितली. त्यांना १४ तारखेपर्यंत वेळ देण्यात आला. आंदोलकांच्या वतीने केदार नायकवडी आणि वरुण माने यांनी बाजू मांडली. बुधवारी हुतात्मा बझारबाबत केलेल्या तक्रारीवर सुनावणी आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here