महाराष्ट्राचे ऊस संशोधन शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियात; तंत्रज्ञानाचा केला अभ्यास

पुणे : महाराष्ट्रातील उसाची शेती आणि साखर उद्योग अधिक आधुनिक, संशोधनाधारित व जागतिक स्पर्धात्मक बनविण्याच्या उद्देशाने पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील विविध जागतिक दर्जाच्या ऊस संशोधन संस्था, प्रगत प्रयोगशाळा, फिनॉमिक्स केंद्रे, स्पीड ब्रीडिंग सुविधा तसेच आधुनिक साखर कारखान्यांना भेट देत सविस्तर अभ्यास दौरा केला.

शिष्टमंडळात नियामक मंडळाचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशीर कपिल आणि रेणूजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’च्या अत्याधुनिक ‘आयरिस’ प्रयोगशाळेला भेट दिली.

ChiniMandi WhatsApp Channel

या प्रयोगशाळेमध्ये ऊस जीनोमिक्स, रोग निदान, टिश्यू कल्चर, साइटोजेनेटिक्स, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मृदा आणि पोषण विश्लेषणासंदर्भातील आधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध असून ऊस उद्योगासाठी वेगवान आणि अचूक संशोधन कार्य येथे केले जाते. तसेच ‘द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’ येथील स्पीड ब्रीडिंग सुविधेची पाहणी करण्यात आली. नियंत्रित तापमान, कृत्रिम प्रकाश व्यवस्था आणि आधुनिक नियंत्रित वातावरण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी कालावधीत नवीन ऊस व इतर पिकांच्या जाती विकसित करण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादनक्षम आणि प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शिष्टमंडळाने कृत्रिम प्रकाश नियंत्रणाद्वारे ऊसात फुलोरा प्रेरित करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. याशिवाय ‘वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी’ अंतर्गत कार्यरत ‘ऑस्ट्रेलियन प्लांट फिनॉमिक्स नेटवर्क’च्या अत्याधुनिक नियंत्रित वातावरण व हाय-थूपुट फिनॉमिक्स सुविधेचीही पाहणी करण्यात आली. ड्रोन, सेन्सर, इमेजिंग प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सच्या साहाय्याने पिकांची वाढ, दुष्काळ सहनशीलता, पोषण कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता यांचे अचूक विश्लेषण कसे केले जाते, याचा अभ्यास शिष्टमंडळाने केला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here