सातारा : आगामी चार वर्षात किसन वीरसह खंडाळा कारखाना सुस्थितीत आणण्याची खासदार नितीन पाटील यांची घोषणा

सातारा: किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने अतिशय काटकसरीने यशस्वीरित्या चालवून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक, चालू व्यापारी देणी दिले आहेत. किसनवीर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्न सुरू आहेत. आगामी चार वर्षांत किसनवीर व खंडाळा दोन्ही कारखाने सुस्थितीत आणणार आहे असा विश्वास खा. नितीन पाटील यांनी व्यक्त केला. किसनवीर कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, किरण काळोखे, हनमंतराव चौवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे उपस्थित होते. आंदोलकांनी समोर येऊन चर्चा करावी, हिशोब देण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

खासदार पाटील म्हणाले की, आजमितीस कारखान्याने नऊ बँका आणि पतसंस्थांची अशी मिळून सतरा कर्ज खाती मिटवली आहेत. आता फक्त दोन बँकांची असणारी देणी लवकरच देणार आहे. कारखान्यास मिळालेल्या ४६७कोटी रुपयांमधील सर्व रक्कम आपण त्याच कामासाठी वापरत आहोत. त्यातील एकही रुपया या कारखान्याच्या दैनंदिन कामासाठी वापरला नाही. किसनवीर व खंडाळा सहकारी साखर कारखान्याने एनसीडीसी कडून मिळालेल्या रकमेतून पूर्वीच्या संचालक मंडळाची बँकांची, व्यापारी देणी, इतर देणी आत्तापर्यंत बँकांशी चर्चा करून तडजोडीने करुन थकित देणी दिलेले आहेत. शासकीय देणी, जीएसटी, आयकर, कामगारांच्या भविष्या निर्वाण निधी चे पैसे देण्यात आमचे व्यवस्थापन यशस्वी झाले आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती कठीण असल्याने इतर कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे साखर साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक असूनही आपल्याला साखर तारणावर कर्ज मिळत नाही. त्यामुळे साखर विक्री करूनच शेतकऱ्यांना उसाचे बिल द्यावे लागत असल्याचे खा. नितीन पाटील यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here