सोलापूर : भीमा कारखान्याचे पाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट, मिल रोलर पूजनाने तयारी सुरू

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कारखान्याने आगामी गळीत हंगामात कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंग तसेच दुरुस्तीची कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संचालक तात्यासाहेब नागटिळक यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक व कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

कारखान्याचे संचालक अनिल गवळी, कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन झाले. आगामी गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करार पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. अध्यक्ष विश्वराज महाडिक म्हणाले की, आगामी ऊस गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पर्जन्यमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल. आगामी गळीत हंगाम संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या सहकार्यान नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास मला वाटतो.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here