सोलापूर : ऊस वाहतुकीच्या आमिषाने लोकनेते कारखान्याची ३४ लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : साखर कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी टोळ्या देतो, असे सांगून ३४ लाख ५० हजार रुपयांची उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या व्यक्तींविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याच्यावतीने याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रामेश्वर दगडू गव्हाणे (रा. बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड), जगन्नाथ बाळू जाधव (रा. जाधवतांडा, निमगाव, ता. माजलगाव, जि. बीड) आणि दत्तात्रय दगडू गव्हाणे (रा. बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी संशयितांची नावे आहेत. तिघेही संशयित बीड जिल्ह्यातील आहेत.

याबाबत कारखान्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी टोळ्या देतो, असे सांगून लाखो रुपयांची उचल घेतली. यासाठी कारखान्याबरोबर लेखी करार केला. ॲडव्हान्स रक्कम उचलली. मात्र टोळ्या पुरविण्याचे काम न करता ही रक्कम स्वतःसाठी वापरून कारखान्याची फसवणूक केली आहे. यापैकी रामेश्वर दगडू गव्हाणे याने दहा लाख रुपये उचलले. संशयित जगन्नाथ बाळू जाधव याने सात लाख रुपये आणि दत्तात्रय दगडू गव्हाणे याने सतरा लाख पन्नास हजार रुपये घेऊन कारखान्याला गंडा घातला असे तक्रारीत म्हटले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here