सांगली : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनलकडे २०० जण इच्छुक, आमदार डॉ. अतुल भोसले यांची माहिती

सांगली : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनल कडून २१ जागांसाठी जवळपास २०० जणांनी मागणी केली आहे. त्यामुळे कोणाला कशी संधी द्यायची यासाठी नेतृत्वाची कसोटी लागणार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले. भवानीनगर (ता. वाळवा) येथे शेतकरी सभासद संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. संचालक पद म्हणजे काटेरी मुकूट आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांनी दहावेळा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी इच्छुकांना दिला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याप्रसंगी माजी सरपंच भरतनाना कदम यांनी कार्यकर्त्यांसह सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ नेते बी. डी. पवार, राजारामबापू बँकेचे संचालक संजयबापू पाटील, दिलीपराव मोरे-पाटील, शिवाजीराव वाटेगावकर, सुश्मिता जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, साखर कारखाना हा राजकारण करण्याची जागा नव्हे. कारण यापूर्वी अनेक वेळा स्थित्यंतरे झाल्यामुळेच कारखान्याची आर्थिक घडी विस्कटलेली होती. गेल्या काही काळापासून कारखान्याला स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळेच सध्या कारखाना हा महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना म्हणून नावाजला जात आहे. सध्या ऊस वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजूनही बरीच जमीन ओलिताखाली आणणे आवश्यक आहे. जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी सभासदांना प्रोत्साह दिले जात आहे. माजी सरपंच भरत कदम यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच जयंत कदम यांनी स्वागत केले. संतोष कदम यांनी आभार मानले. बी. एन. पवार, प्रतापराव मोहिते-पाटील, सुश्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सुशिल सावंत, संपत औताडे, लक्ष्मण तांदळे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here