सातारा : आधीचा करार मोडून श्रीराम कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिल्याबाबत विरोधकांचा आक्षेप

सातारा : श्रीराम साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे संपूर्ण अधिकार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने काढून घेतले होते. मात्र संचालक मंडळाने परस्पर संगनमत करून ही सभा घेतली आहे. त्यांचे काम पूर्णपणे चुकीचे सुरू आहे. कारखाना कर्जमुक्त होणार होता मग तडजोड करून करार कसा मोडला? हा कारखाना सहकारी कारखान्याला चालविण्यास द्यावा, असे असताना मग खाजगी कारखान्याला का चालवायला देताय, असा सवाल माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी केला. यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, अभिजित नाईक- निंबाळकर, अॅड. नरसिंह निकम, विलासराव नलावडे उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, जर आठ कोटी रुपये मिळणार आहेत तर मग कारखाना तुम्ही का चालवत नाही ? २५ वर्षे चालवायला देऊन ही कारखाना कर्जमुक्त झाला नाही. कारखान्यावर ११५ कोटी रुपये कर्ज कसे झाले?, असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, संचालक मंडळाला मंत्री समितीने नफ्यातील दोनशे रुपये सभासदांना द्या, असे आदेश दिले असताना तुम्ही ते आदेश का पाळले नाहीत. जर अधिकार दिले तर सर्वसाधारण सभा घ्या, त्याची तुम्ही माहिती सरकारकडे पाठवा. जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, ही विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार नाही. मग का व कशासाठी सभा बोलाविली?. ते म्हणाले की, एप्रिल २६ ला राज्य सरकारने सांगितले आहे की निवडणूक झाली नाही, त्यांना सभा बोलविण्याचा अधिकार नाही. नेहमीपेक्षा सभासद जादा आले होते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे होती, ती मिळाली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here