सातारा : सह्याद्री कारखान्यात गळीत हंगामाची तयारी, मिल रोलर पूजन उत्साहात

सातारा: माजी सहकार व पणनमंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजन समारंभ उत्साहात पार पडला. उपाध्यक्ष कांतीलाल भोसले -पाटील तसेच विद्यमान संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन गळीत हंगाम यशस्वी व विक्रमी ठरण्याच्या शुभेच्छांसह धार्मिक वातावरणात पूजन सोहळा पार पडला.

मिल रोलर पूजन कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, सुनील जगदाळे, संजय गोरे, संतोष घार्गे आणि संजय कुंभार यांच्या हस्ते गणेश पूजन व मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी संचालक जशराज पाटील, रमेश माने, जयंत जाधव, राजेंद्र चव्हाण, अरविंद जाधव, राहूल निकम, नेताजी चव्हाण, विजय निकम, आण्णासो पाटील, संभाजी साळवे, दिनकर शिरतोडे, दिपक लादे, संचालिका सिंधुताई पवार, कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे, उत्तमराव मोरे, गजानन देशमुख, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here