सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यात सहयोगी ओंकार शुगर कार्पोरेशनच्यावतीने आगामी गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे यांनी गळीत हंगाम २०२६-२७मध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, कारखान्याचे मशिनरीचे देखभाल दुरुस्तीची कामे जलद व सुरळीत चालू असल्याचे सांगितले.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यंदाच्या गळीत हंगामामध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचे काम चालू आहे. आजअखेर ११० ट्रॅक्टरचे, ६० बजेंट, १८५ बैलगाडी व ०४ हार्वेस्टर याप्रमाणे करार करण्यात आले आहे. हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच पूर्ण क्षमतेने चालू करण्याच्यादृष्टीने ऑफ सिझनची सर्व कामे लवकर पूर्ण करण्यास सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत असे सांगण्यात आले. व्हा. चेअरमन भारत कोळेकर, सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक पी. डी. घोगरे, जनरल मॅनेजर आर. आर. साळुंखे, सभासद शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.


















