लातूर : जागृती शुगरतर्फे वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटपासह सामाजिक उपक्रम

लातूर : तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्यातर्फे दिवंगत माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबविण्यात आले. कारखानास्थळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जागृती शुगरचे संचालक दिलीप माने, शिवाजीराव केंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, राळकर, प्रा. शशिकांत कदम, संभाजी रेड्डी, तळेगावचे उपसरपंच धनाजी जाधव, वलांडीचे सरपंच राम भंडारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मंगळवारी प्रारंभी कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी तळेगाव, बालाजी वाडी आणि अचवला येथील जिल्हा परिषद शाळांतील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यात स्कूल बॅग, कंपास, पॅड यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला कारखान्याचे महाव्यवस्थापक गणेश येवले, मुख्य शेती अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंता अतुल दरेकर, उपअभियंता अक्षय सूर्यवंशी, गंगाधर जाधव, विलास जाधव, दिलीप काशीद, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिराजदार, बालाजी कारभारी, धनराज चिद्रे, माधवराव पाटील, मुस्ताक कादरी, मालबा घोनसे, धनाजी कोटे, भीमा खुटेगावे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here