सोलापूर : ‘गोकुळ शुगरकडील थकीत ऊस बिल देण्यासाठी हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष

सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या ऊस पुरवठा शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलाची रक्कम तातडीने देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, निलंगा आणि अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर आता याप्रकरणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी लक्ष घातले आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेत रजेवर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. याबाबत जमदाडे यांनी सांगितले की,साखर आयुक्तांनी आर आर सी कारवाईचे आदेश दिले. हा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी माझ्याकडे पाठवला. आदेश मिळाल्यापासून कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांची एफआरपी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. इतरही मार्गाने रक्कम मिळण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाशी आमचा संपर्क सुरू आहे. शेतकरी प्रतिनिधी अॅड. अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि अडचणी मांडल्या.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here