सोलापूर : पिकांवरील हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

सोलापूर : सध्याच्या बदलत्या वातावरणातील परिस्थितीनुसार शेतातील उभी पिके व फळबागांवर विविध प्रकारचे किटक व रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होत आहे. उसासह विविध पिके, फळबागांसाठी धोकादायक असलेल्या हुमणीचे भुंगेरे व इतर किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात कमी खर्चिक, सहजसाध्य प्रकाश सापळा तयार करावा, असे आवाहन माढ्याचे मंडल कृषी अधिकारी विष्णू निकत यांनी केले. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

मंडल कृषी अधिकारी निकत म्हणाले की, कीड, रोगांमुळे पिके व फळ बागांचे अतोनात नुकसान होते. शेतकऱ्यांनी केलेला लाखों रुपये खर्च वाया जाऊन शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे या टप्प्यावर सुरुवातीलाच काळजी घ्यायला हवी. तर आपले पिक वाचवता येईल. निकत यांनी शेतकऱ्यांना विविध संकरित बी-बियाण्याची उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, माती व पाणी परीक्षणाचे महत्व, कृषी निविष्ठा औषधांची ओळख व त्यांचा वाजवी वापर यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. सहाय्यक कृषी अधिकारी गणेश माळी, दोन्ही गावांतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, संचालक, ग्रामस्थ, युवक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here