जालना : ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना वसतीगृहात मोफत प्रवेश सुरू

जालना : समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाची यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. नऊ शासकीय वसतीगृहांची एकूण प्रवेश क्षमता ९०० विद्यार्थ्यांची आहे. पाचवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या ऊसतोड कामगाराचा पात्र आहे.

दरवर्षी ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ही वसतिगृहे चालवली जातात. जिल्ह्यात जालना, अंबड, मंठा, बदनापूर आणि घनसांगवी येथे ही नऊ वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, वह्या-पुस्तके, शालेय साहित्य आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय जिल्हास्तरीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये आणि तालुकास्तरीय वस्तीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना पाचशे रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांनी या वसतिगृहांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन समाजकल्याण खात्याच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here