अहिल्यानगर : राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण, नोंदणी आणि ओळखपत्र वितरण अभियान सुरू

अहिल्यानगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण, नोंदणी आणि ओळखपत्र वितरण अभियान सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून जिल्ह्यात सर्वेक्षण व नोंदणीचे काम सुरू झाले असून ऊसतोड कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

ऊसतोड कामगारांना विविध शासकीय सेवा, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने ‘गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ’ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभ करण्यासाठी सर्वेक्षण, नोंदणी आणि ओळखपत्र वितरण मोहीम राबविण्यात येत आहे.कामगारांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती अथवा सर्वेक्षण पथकाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र, ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व शिधापत्रिका ही नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here