नाशिक : कादवा कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प वर्षभर चालविणार – अध्यक्ष शेटे यांची घोषणा

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामाचे पूजन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याची क्षमता २५०० मेट्रिक टनांवरून ३५०० मेट्रिक टन करण्यात येणार आहे. पुढील गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. इथेनॉल प्रकल्पही वर्षभर सुरू राहणार असल्याने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. बदलत्या काळानुसार निर्णय घेणारे उद्योगच टिकून राहतात. त्यामुळे कारखान्याने गाळप क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून जादा गाळप होऊन ऊसतोड वेळेत पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, “कादवा कारखान्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील हा एकमेव साखर कारखाना असून त्याची क्षमता आता ३५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढत आहे. काळानुसार बदल स्वीकारत कारखाना राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे. संचालक शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, विश्वासराव देशमुख, अरुण मुळाणे, सदाशिव शेळके, रामकृष्ण तिडके, साहेबराव पाटील, बाबूराव डोखळे, जयराम डोखळे, विष्णुपंत पाटील, हरीश नगरकर, अशोक वाघ, अशोक भालेराव उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here