सांगली : महांकाली साखर कारखान्याच्या जागेवरील प्लॉटधारकांची नावे उताऱ्यावरून गायब; तलाठी कार्यालयात प्लॉटधारकांची गर्दी

सांगली : प्लॉट खरेदीसाठी लाखो रुपये मोजले, खरेदी दस्त केले, सातबारावर नावही चढले; मात्र अचानक उताऱ्यावरूनच नावे गायब झाल्याने महांकाली साखर कारखान्याच्या प्लॉटधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त प्लॉटधारकांनी शुक्रवारी तलाठी आणि सर्कल कार्यालयात गर्दी केली होती.कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस काढली होती. यासाठी कारखाना प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि शिवलँड मार्क कंपनी यांच्यात करार झाला. त्यानुसार शिवलैंड मार्क कंपनीमार्फत जागेचा विकास करून प्लॉट पाडून विक्री केली.

अनेक नागरिकांनी रीतसर रक्कम भरून खरेदी दस्त करून घेतले होते. व्यवहारानंतर संबंधित प्लॉटधारकांची नावे सातबारा उताऱ्यावरही नोंदविण्यात आली होती. दरम्यान, महांकाली सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने सभासदांच्या मालकीची जमीन वाचविण्यासाठी न्यायालयीन लढा उभारला होता. या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील शिवलँड मार्क कंपनीचे नाव उताऱ्यावरून कमी झाल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित प्लॉट खरेदीदारांची नावेही उताऱ्यावरून अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. कारखाना प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती बँक, शिवलँड मार्क कंपनी आणि बचाव कृती समिती यांच्यातील वादाच्या भोवऱ्यात आता पैसे भरून प्लॉट खरेदी केलेले ग्राहक अडकले आहेत. उताऱ्यावरून नावे कमी झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ व भिती निर्माण झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here