पुणे : ‘श्रीनाथ म्हस्कोबा’चा २३वा मिल रोलर पूजन; १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस लागवडीची अधिकृत नोंद

पुणे : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २३ व्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. सकाळी इंजिनिअरींग कारखान्याच्या विभागातील कर्मचारी ईश्वर बबन ठोंबरे व पत्नी मंजुषा यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कारखान्याकडे येत्या हंगामासाठी १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस लागवडीची अधिकृत नोंद झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील जनावरांचा चारा, बेणे, इतर कारखाने व गुऱ्हाळांसाठी वापरल्या जाणाऱ्या उसाची विल्हेवाट वजा जाता कारखान्याला गाळपासाठी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.

कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, ‘चालू मान्सून हंगामात अद्याप म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत असला, तरीही उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही. कारखान्याने आगामी गळीत हंगामामध्ये निर्धारित केलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक किसन दिनकर शिंदे, भगवान दशरथ मेमाणे, हनुमंत बबन शिवले, लक्ष्मण पांडुरंग कदम, चंद्रकांत अंकुशराव ढमढेरे, कारखान्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन. यादव, चिफ इंजिनिअर एन. ए. भुजबळ, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, सर्व अधिकारी, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here