सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब या कारखान्याच्या पुढील ऊस गाळप हंगामाची २०२६-२७ ची पूर्वतयारी सुरू असून, युनिट नं.१ पिंपळनेर येथील मिल रोलरचे पूजन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते व युनिट नं.२ करकंब येथील मिल रोलरचे पूजन व्हाईस चेअरमन पोपट गायकवाड यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर झाले.याप्रसंगी रणजितसिंह शिंदे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक चेअरमन बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांची यशस्वी घोडदौड सुरू असून येत्या हंगामासाठी २० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, आजअखेर ३३ हजार हेक्टरची ऊस नोंद झालेली आहे. तसेच युनिट नं.२ करकंब येथे आजअखेर ८ हजार ५४८ हेक्टरची ऊस नोंद झालेली असून, ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
यापूर्वी साखर कारखाने ६ ते ७ महिने चालत होते, परंतु मागील ३ ते ४ वर्षापासून साखर कारखान्याचे गाळप ४ महिन्यांवर येवून ठेपले आहे. हा बदल विचारात घेऊन आपल्याला देखील यापुढे काटकसरीने कारभार करून मेन्टेनन्स खर्च कमी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. या बरोबरच शेतकऱ्यांचे प्रतिएकर ऊस उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकावर देखरेख ठेवण्यासाठी व अचूक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कारखान्याने अंदाजे २० हजार एकर क्षेत्रावर अत्याधुनिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
ऊस गाळप हंगामासाठी आवश्यक ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच करार करण्यात आलेल्या ट्रक ट्रॅक्टर्स, बैलगाडी व ट्रॅक्टर टायरगाडीच्या यंत्रणेस कारखाना धोरणाप्रमाणे लवकरच पहिला अॅडव्हान्स हप्ता अदा केला जाणार आहे. ऊस तोडणी वाहतूक, ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत. पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे देऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमास संचालक रमेश येवले-पाटील, लाला मोरे, अशोक मिस्कीन, पांडुरंग घाडगे, पंडित पाटील राजेश खोत, संजय लोकरे, विलान कौलगे, राजाराम नाळे, राजाराम थोरात जितेंद्र गायकवाड, श्रीकांत पाटील, सचि देशमुख, कार्यकारी संचालक एस.एन डिग्रजे, जनरल मॅनेजर पी. एस. येलपले केन मॅनेजर एस.पी. थिटे, चिफ इंजिनिअ एस.डी. कैचे, डिस्टीलरी मॅनेजर पी. व्ह बागल, चिफ केमिस्ट ए. के. जगताप, हे टाईम किपर आर.एन. आतार, चिप् इंजिनिअर एस.एस. महामुनी, चिफ केमिस बी. जे. साळुंखे, मुख्य शेतकी अधिका-आर.जे. पाटील, असि. परचेस ऑफिस एस.व्ही. चौगुले, हेड टाईम किपर टी. लोंढे, अनिल वीर, शशिकांत पवार न इतर मान्यवर उपस्थित होते.


















