सांगली : महांकाली साखर कारखान्यात परिवर्तन घडवून आणण्याचा कारखाना बचाव कृती समितीचा निर्धार

सांगली : येथील शाही दरबार कार्यालयात महांकाली कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने कामगार मेळावा झाला. यावेळी कारखाना हा सहकारी तत्त्वावर उभारलेला असला तरी त्याचे कामकाज अनेक वर्षे खासगी कारखान्याप्रमाणे चालले. त्यामुळे आगामी निवडणुकीत कामगार, सभासद आणि हितचिंतकांनी तन-मनाने एकत्र येऊन परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे, असे समितीचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांनी सांगितले. त्यांनी जुना प्रसंग सांगत कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. मेळाव्यानंतर समितीचे निमंत्रक संदीप गिड्डे-पाटील यांनी कामगारांशी संवाद साधला. कामगारांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. उपस्थित कामगारांनीही आपली मते मोकळेपणाने मांडली. गिड्डे-पाटील यांनी समितीची भूमिका स्पष्ट करत कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

निमंत्रक संदीप गिड्डे-पाटील म्हणाले की, “महांकाली साखर कारखाना ही तालुक्याची अस्मिता असून तो पुन्हा सुरू व्हावा, यासाठी बचाव कृती समिती प्रयत्नशील आहे. आगामी काळात कारखान्यात परिवर्तन झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात कारखान्यावरील सर्व कर्जाची फेड केली जाईल. तसेच गेल्या काही वर्षांत कारखान्यातील साहित्य कोणी नेले असेल, तेही पुढील सहा महिन्यांत न मागता परत येईल. यावेळी विक्रम कोळेकर यांनी स्वागत केले, माजी सभापती गजानन कोठावळे यांनी आभार मानले. मेळाव्यास मिलिंद कोरे, श्रीरंग कोरे, दादासाहेब ढेरे, अविराजे शिंदे, भानुदास भोसले, पंडित माळी, युवराज ओलेकर, दिनकर जाधव, विठ्ठल जाधव, शहाजी कोळेकर, राजकुमार वायदंडे, भारत पाटील, नेताजी पाटील, हणमंत कुंभारकर, उद्धव पाटील, बाजीराव मोरे, आत्माराम बसवर, कल्लाप्पा फुटाणे, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब कोळेकर, राजेंद्र पाटील, श्रीपाल (नेमगोंडा) पाटील आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here