कोल्हापूर : ‘गोडसाखर’कडून कमिशन डिपॉझिटची रक्कम वाहतूक प्रतिनिधींच्या खात्यात जमा

कोल्हापूर : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मधील तोडणी-वाहतूक प्रतिनिधींची कमिशन व डिपॉझिटची देय रक्कम १ कोटी २४ लाख ९२ हजार ५४० रुपये संबंधित तोडणी-वाहतूक प्रतिनिधींच्या बँक सेव्हिंग खात्यावर वर्ग केली आहे.

संबंधित तोडणी-वाहतूक प्रतिनिधींनी आपल्या बँकेशी संपर्क साधून कमिशन व डिपॉझिटची रक्कम उचल करावी, तसेच हंगाम २०२६-२७मधील तोडणी-वाहतुकीची बिले दर पंधरवड्यास तोडणी वाहतूक प्रतिनिधींचे बँकेतील सेव्हिंग खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन केले आहे. याची तोडणी-वाहतूक प्रतिनिधींची नोंद घेऊन कारखान्यास नियमित उसाचा पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here