अहिल्यानगर : विजेच्या वाढत्या मागणीमुळे सर्वत्र विजेचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने बांधलेल्या अद्ययावत नवीन प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की, वीज बचतीबरोबर भविष्यासाठी सौर ऊर्जेचा वापर हा काळाची गरज आहे. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग घुले यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग घुले, संचालक विजय राहणे, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, योगेश भालेराव, सतीश वर्षे, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.


















