सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रातील ४२ शेतकरी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये आयोजित ‘ऊस शेती ज्ञानयाग’ प्रशिक्षणासाठी रवाना झाले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादन वाढवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरात राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. यावर्षी शिबिरात ऊस शेतीसाठी एआय प्रणालीचा वापर, माती परीक्षण, खत व पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, रोग व कीड नियंत्रण आणि जैविक खतांचा वापर अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, संभाजीराव पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, बाजीराव थोरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने आणि ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते


















