केंद्राकडून जुलैसाठी महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात ७.७१ टक्क्यांची घट, देशांतर्गत बाजारासाठी २२ लाख टनांचा कोटा कायम

कोल्हापूर : केंद्र सरकारने जुलै २०२६ महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी २२ लाख मेट्रिक टन साखरेचा मासिक कोटा जाहीर केला आहे. पावसाळ्यात साखरेची मागणी स्थिर राहण्याचा अंदाज आणि बाजारस्थिती लक्षात घेऊन जूनप्रमाणेच जुलै महिन्यासाठीही एकूण कोटा कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या कोट्यात जूनच्या तुलनेत ७.७१ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

राज्यनिहाय कोट्यानुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक ८.२३ लाख टन, तर महाराष्ट्राला ७.१८ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या कोट्यात ६० हजार ३६ टनांची (७.७१ टक्के) घट झाली आहे. दुसरीकडे, कर्नाटकच्या कोट्यात ११.५४ टक्के, तमिळनाडूच्या कोट्यात ६१.०६ टक्के, पंजाबच्या कोट्यात १९.९५ टक्के आणि हरियाणाच्या कोट्यात ८.२० टक्के वाढ करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

देशांतर्गत बाजारात चांगल्या खरेदीमुळे प्रमुख स्पॉट बाजारांतील साखरेचे दर स्थिर आहेत. आगामी काळात पुरवठा तुलनेने मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने बाजारातील सकारात्मक वातावरण कायम असल्याचे व्यापारी आणि बाजार अभ्यासकांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here