ठाणे : घोडबंदर उड्डाणपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने १२ टन गूळ भरलेला ट्रक लटकला

ठाणे : पुण्यावरून डहाणूकडे १२ टन गूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून कासारवडवली पुलाचा कठडा तोडत अर्धवट खाली लटकला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. ट्रक अर्धवट लटकून राहिल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रणात ठेवत आवश्यक उपाययोजना केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ट्रक कासारवडवली उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला. ट्रक दुभाजकावर आदळल्यानंतर पुलाच्या कठड्याबाहेर अर्धवट लटकलेल्या अवस्थेत अडकला. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी, हायड्रा आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here