लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये नव्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शामली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आता आगामी गळीत हंगाम २०२६-२७ ची तयारी सुरू केली आहे. कारखान्यांमध्ये मशीनरीची दुरुस्ती आणि देेखभालीचे तांत्रिक काम गतीने सुरू आहे. शामली कारखान्यातील ब्रेकडाऊनच्या घटना रोखण्यासाठी जुने टर्बाइन हटवून सात मेगावॅट आणि अडीच मेगावॅटचे दोन टर्बाइन बसविण्यात येत आहेत. यासोबतच वीज पुरवठा वाढविण्यासाठी दोन नवीन पंप बसवले जातील. कारखान्यातील दुरुस्तीचे जवळपास ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती शामली कारखान्याचे युनिट हेड संजय कुमार शर्मा यांनी दिली. जुन्या तीन टर्बाइन हटवून सात मेगावॅटचे एक आणि अडीच मेगावॅटचे एक टर्बाइन बसवले जाईल. यातून ब्रेकडाउनची समस्या दूर होईल. तीन टर्बाइनच्या जागी मोटर बसवल्या जातील.
ऊन साखर कारखान्यात दुरुस्तीचे काम ४० टक्के पूर्ण झााल्याची माहिती कारखान्याचे महाप्रबंधक कुलदीप पिलानिया यांनी दिली. तर थानाभवन सााखर कारखान्याचे महाव्यवस्थापक लेखपाल सिंह यांनी सांगितले की, कारखाान्यात देखभाल, दुरुस्तीचे काम गतीने सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाातील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १७२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. यामध्ये थानाभवन सााखर कारखान्याकडे सर्वाधिक १३६ कोटी रुपयेे तर ऊन साखर कारखान्याकडे ३६ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शामलीप्रमाणेच अन्य ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्येही कारखान्यांकडून आगामी हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे.


















