गाळप हंगाम २०२६-२७ : महाराष्ट्रात साखर उत्पादन २८.२५ लाख टनांवर

पुणे: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी २०२६-२७ च्या चालू गळीत हंगामात २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण २८.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील हंगामातील याच कालावधीच्या तुलनेत हे उत्पादन जवळपास दुप्पट आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या ताज्या गाळप अहवालातून ही माहिती समोर आली आहे.अहवालानुसार, राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३१४.०९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या काळात राज्यातील सरासरी निव्वळ साखर उतारा ८.९९ टक्के नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १९१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, त्यामध्ये ९२ सहकारी आणि ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांची एकत्रित दैनिक गाळप क्षमता १०,४३,७०० टन आहे.

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, मागील गळीत हंगामात २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १८४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यामध्ये ९२ सहकारी आणि ९२ खासगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी १८९.९६ लाख टन उसाचे गाळप करून ७.५६ टक्के सरासरी उताऱ्यासह १४.३६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.त्यामुळे चालू हंगामात मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत साखर उत्पादनात जवळपास ९७ टक्के, तर ऊस गाळपात सुमारे ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

साखर उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर

साखर उत्पादनाच्या बाबतीत पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या विभागातील ३१ कारखान्यांनी ८२.१३ लाख टन उसाचे गाळप करून ९.७६ टक्के उताऱ्यासह ८.०१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.दरम्यान, कोल्हापूर विभागात राज्यातील सर्वाधिक १०.०८ टक्के साखर उतारा नोंदविण्यात आला आहे. या विभागातील ३८ कारखान्यांनी ५३.३५ लाख टन उसाचे गाळप करून ५.३८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

सोलापूर विभागात सर्वाधिक ४२ कारखान्यांचे गाळप सुरू

सोलापूर विभागात सर्वाधिक ४२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी ५९.९२ लाख टन उसाचे गाळप करून ८.२ टक्के उताऱ्यासह ४.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.अहिल्यानगर विभागातील २६ कारखान्यांनी ४३.३७ लाख टन उसाचे गाळप करून ८.७१ टक्के उताऱ्यासह ३.७८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती

नांदेड विभागात ३० कारखाने सुरू असून, त्यांनी ३९.७९ लाख टन उसाचे गाळप करून ८.२६ टक्के उताऱ्यासह ३.२९ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.छत्रपती संभाजीनगर विभागातील २१ कारखान्यांनी ३२.१२ लाख टन उसाचे गाळप करून २.६० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागात राज्यातील सर्वात कमी ८.०९ टक्के साखर उतारा नोंदविण्यात आला आहे.

अमरावतीत तीन खासगी कारखाने सुरू; नागपूर विभागात अद्याप गाळप नाही

अमरावती विभागात तीन खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी ३.४१ लाख टन उसाचे गाळप करून ८.१५ टक्के उताऱ्यासह ०.२८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, नागपूर विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचे गाळप सुरू केलेले नाही

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here