2026-27 मध्ये जागतिक साखर बाजारात किरकोळ तुटीची शक्यता; युरोपातील घटलेल्या उत्पादनाचा परिणाम : झार्निकोव

लंडन : साखर दलाल आणि पुरवठा साखळी सेवा देणारी कंपनी झार्निकोव (Czarnikow) यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक साखर बाजारात 2026-27 हंगामात सुमारे 6 लाख मेट्रिक टनांची किरकोळ तूट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे युरोपियन युनियन (EU) मधील साखर उत्पादनात होणारी घट असल्याचे सांगण्यात येत आहे.

युरोपातील उष्णतेच्या लाटेमुळे बीट पिक धोक्यात

ChiniMandi WhatsApp Channel

अहवालानुसार, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक प्रदेश असलेल्या युरोपमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटेमुळे (हीटवेव्ह) साखर बीट पिकावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, साखर कारखान्यांना उत्पादन खर्च भागवणे कठीण जात असल्याने बीट लागवडीखालील क्षेत्रही कमी झाले आहे. ‘झार्निकोव’ने सांगितले की, युरोपियन आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार बीट लागवडीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे 2026-27 हंगामासाठी EU-27 मधील साखर उत्पादनाचा अंदाज कमी करून 1.39 कोटी टन करण्यात आला आहे.

2025-26 मधील अतिरिक्त उत्पादनामुळे टंचाईची शक्यता नाही

कंपनीच्या अहवालात म्हटले आहे की, पुढील हंगामात किरकोळ तूट अपेक्षित असली तरी 2025-26 हंगामातील मोठ्या अतिरिक्त उत्पादनामुळे सध्या जागतिक स्तरावर साखरेची टंचाई निर्माण होणार नाही.मात्र, यामुळे पुढील काळात इतर प्रमुख साखर उत्पादक देशांतील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाल्यास जागतिक बाजार अधिक अस्थिर होऊ शकतो.

एल निनोमुळे चिंतेचे ढग…

झार्निकोवने इशारा दिला आहे की, हवामानाशी संबंधित धोके वाढत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेने नुकताच एल निनोचा अंदाज वाढवून तो ‘स्ट्राँग’ असल्याचे सांगितले असून, पुढील काही महिन्यांत तो ‘व्हेरी स्ट्राँग’ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भारत आणि थायलंड या प्रमुख ऊस उत्पादक देशांमध्ये ऊस वाढीच्या काळात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पादन घटू शकते. तर जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक ब्राझील येथे अतिवृष्टीमुळे ऊस तोडणीला विलंब होऊन साखरेच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, प्रमुख उत्पादक देशांमध्ये प्रतिकूल हवामान कायम राहिल्यास जागतिक साखर पुरवठ्यावर आणखी दबाव वाढू शकतो.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here