सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत नागरिकांना टँकरमार्फत पाणी पुरवठा

सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत अकलूज, माळेवाडी, संग्रामनगर व शंकरनगर येथील नागरिकांना टँकरमार्फत आर.ओ. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी सयाजीराजे मोहिते-पाटील मित्र मंडळ परिवार, अकलूज यांनी जनतेची सेवा हेच कर्तव्य मानून पाणी वाहतूक तसेच वितरण करणेसाठी स्वयंसेवक म्हणून मोठा सहभाग नोंदविला असल्याचे सांगितले. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पुर आला आहे. यामुळे पूर पुरस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही भागात अद्याप पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाई निर्माण होवून शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.

कारखाना कार्यक्षेत्रामधील पुरवठा होत असलेल्या विझोरी तलावात पाणी साठा उपलब्ध नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडून येणारे पाणी वेळेत न मिळाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. सदर भागातील पिण्याच्यापाण्याची समस्या सोडविण्याकरिता सामाजिक बांधीलकीचा एक भाग म्हणून कारखान्यामार्फत मोफत आर.ओ. प्रक्रिया केलेल्या शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरव्दारे सुरू केला आहे. पावसाची अनिश्चितताव पाटबंधारे विभागाकडून पाणी उपलब्धता याचा विचार करता सर्व नागरिकांनी टँकरव्दारे मिळणारे पाणी शिस्तीने घेवून काटकसरीने वापरावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here