धाराशिव : तेरणा कारखान्यातील ५ कोटीच्या भंगार विक्रीस विरोध, सभासदांसह कामगारांनी रोखली वाहने

धाराशिव : येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना धाराशिव जिल्हा बँकेने कारखान्याकडे असलेल्या कर्जापोटी ताब्यात घेऊन तो २०२२ मध्ये भैरवनाथ शुगर्सला २५ वर्षाच्या भाडे करारावर दिला आहे. कारखाना चालविण्यास दिला असला तरी तेथील वापरण्यात नसलेल्या यंत्रणा व इतर भंगार बँकेने लिलाव पुकारून विक्रीस काढले होते. त्यानुसार हा लिलाव हैदराबाद येथील एका ठेकेदाराने ५ कोटी रुपयांमध्ये घेतल्याचे कळते. परंतु, कारखान्यातील भंगार १० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे असताना कमी किमतीला विक्री केली गेल्याचा आरोप कामगार व सभासद शेतकऱ्यांनी केला. सर्वांनी ठेकेदाराची वाहने अडवून धरत भंगार विक्रीस विरोध केला.

धाराशिव जिल्हा बँकेकडून अवसायकास दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नातून २५ टक्के रक्कम तेरणेचे माजी कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना मागील चार वर्षापासून एकही रुपया बँकेने दिलेला नाही. त्यामुळे कारखान्याच्या माजी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, शिल्लक पगार व इतर रकमा एकाही कर्मचाऱ्यांना मिळालेल्या नाहीत. या माजी कर्मचाऱ्यांचे जवळपास ५५ कोटी रुपये कारखान्याकडून येणे आहे. याच रक्कमेची मागणी करत कामगार व सभासदांनी सदरील भंगाराचे ट्रक अडवून ठेवत त्या बाहेर न सोडण्याबाबत सुरक्षा रक्षक व संबधित कर्मचाऱ्यांना निवेदन देत हे आंदोलन केले. बँकेने अत्यंत कमी किंमतीत विकल्याचा व यासाठी कोणतेही कायदेशीर प्रक्रिया न केल्याचा आरोप कारखान्याचे कामगार व सभासदांनी केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here