अहिल्यानगर : सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जाते. मात्र इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा विरोध वाढू लागला आहे. सोशल मीडियावर ई २० जनता पार्टी स्थापन करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ई २० ला विरोध करण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. शेतकरी उसाची मळी,मका, तांदूळ आणि बांबूपासून इथेनॉल बनवतो, त्याचा वापर वाहनात केला तर आपली पुढची पिढी जगणार आहे नाही तर जगणार नाही. आता ई २० ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे ठरेल, असे वक्तव्य त्यांनी केले.
ज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, ई २० ला विरोध करण्यामागे फारमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या ७० वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही. कारण परदेशातून डिझेल पेट्रोल-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते. म्हणून या विशिष्ट लॉबीने शेतकऱ्यांच्या इथेनॉलला विरोध केला. ब्राझीलसारख्या देशात १०० टक्के इथेनॉलवर वाहने चालतात. याचा तर आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा. इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे, त्याबाबत दरासंदर्भात दिलासा देता येऊ शकतो. मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे. आता फ्लेक्स इंजिन येत आहेत, त्यात ८५ टक्के इथेनॉलवर गाड्या चालवू शकतो, असे ते म्हणाले.


















