सोलापूर : लोकशक्ती साखर कारखान्याकडून गळीत हंगामाची तयारी, कारखान्याचे मिल रोलर पूजन

सोलापूर : औराद येथील लोकशक्ती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडने आगामी गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. कारखान्याने बुधवारी, गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून मिल रोलर पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होोते. कारखान्याचे जनरल मॅनेजर सनिल घालमे यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नोहरभाऊ डोंगरे हे होते. कोरवलीचे उद्योगपती शिवानंद पाटील, कारखान्याचे चेअरमन मानसिग खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे उपस्थित होते.

जनरल मॅनेजर सुनिल घालमे यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी साखर कारखान्याचे गाळप क्षमतेपेक्षा अधिक वाढ केली असल्याचे सांगितले. लोकशक्ती कारखाना हा शेतकऱ्यांचा हक्काचा व विश्वासू कारखाना आहे. लोकशक्ती नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. वेळेवर बिले मिळतील. शेतकऱ्यांना कोणतेही त्रास देणार नाही असे ते म्हणाले. मनोहरभाऊ डोंगरे यांनी गेल्यावर्षी सर्व शेतकरी आणि तोडणी वाहतूकदारांची बिले वेळेत मिळाल्याने यावेळी शेतकरी विश्वासाने ऊस पुरवठा करतील असा विश्वास व्यक्त केला. चीफ इंजिनिअर सिद्धेश्वर शिंदे, कार्यालयीन अधिक्षक विवेक पवार, फायनान्स मॅनेजर शिवाजी शिंदे, इलेक्ट्रिक मॅनेजर अखिलेश बिटे, चीफ केमिस्ट अमोल कुलकर्णी, शेती अधिकारी राजाराम पवार, उपशेती अधिकारी बी. टी. जाधव, नागनाथ शिंदे, राहुल दळवी, प्रहेश खटके, सचिन माळगे, अमोगसिद्ध तीर्थे, शंकर फुलपगार, चंद्रकांत राठोड आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here