सोलापूर : श्री दत्त इंडिया कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप सुरू

सोलापूर : येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप सुरू करण्यात आले आहे. श्री दत्त इंडिया प्रा.लि., हाविनाळ कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्राबाहेरील ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील गळीत हंगाम २०२५-२६ करिता ऊस गळीतास पाठवलेला आहे. अशा सर्व उस उत्पादक शेतक-यांना प्रति मे. टन अर्धा किलो साखर वाटप सुरू केले आहे.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे म्हणाले की, गळीत हंगाम सन २०२७-२६ मधील गळीतास आलेल्या उसाची सर्व बिले, तोडणी वाहतूक बिले इ. सर्व श्री दत इंडिया कंपनीने वेळेत दिली आहेत. चालू गळीत हंगामात हीच परंमा ठेवणार आहे. तेव्हा कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनी देणाऱ्या गळीत हंगामाकरिता आपला सर्व ऊस नौद करून श्री दत्त इंडिया प्रा.लि. कंपनीकडे गीतास पाठवण्याचे आवाहन केले,

ChiniMandi WhatsApp Channel

याप्रसंगी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक शरद भोरे, अमोल शिंदे, प्रशासन अधिकारी रवींद्र गायकवाड, जनरल मॅनेजर रविराज भोसले, अभि. जनरल मेनेजर अनिरुद्ध पाटील, जितेंद्र मेटकरी, व्यंकटेश राव, विनायक पुजारी, चंद्रकांत बिराजदार, एच.आन मॅनेजर हत्तुरे, शेती अधिकारी स्व बिराजदार, सचिन निकम, धनंजय पाटील, संग्राम सूर्यवंशी, सर्व विभा प्रमुख, सेंटर प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here