पुणे : भीमा पाटस बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवडणूक निधी संकलन यात्रेचा प्रारंभ

पुणे : दौंड तालुक्यात स्थापन झालेल्या भीमा पाटस बचाव संघर्ष समितीच्या वतीने पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निधीसंकलन यात्रेचा शुभारंभमंगळवारी दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता पाटस येथून करण्यात आला. ही समिती गावोगावी जाऊन प्रत्येक सभासदांना भेटून त्यांच्या स्वेच्छेने निधी जमा करून घेणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.

संकलित होणारी सर्व रक्कम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांच्या नियंत्रणाखाली नियमानुसार संबंधित संयुक्त बैंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, गेली पाच वर्षे भीमा पाटस कारखान्याने आवश्यक रक्कम न भरल्यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यादरम्यान प्रशासक लागणे गरजेचे होते; मात्र सत्तेचा गैरवापर करूनही कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला नाही. त्यामुळे आता गावोगावचे सभासद आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन लोकसहभाग नोंदवून या निवडणुकीसाठी निधी उभारावा, असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here