सातारा : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशनकडून डॉ. सुरेश भोसले यांना प्रतिष्ठित ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर

सातारा : साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशन’चा प्रतिष्ठित ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांना जाहीर झाला आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याने तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन उच्चांक गाठले आहेत. डॉ. भोसले यांनी सहकार क्षेत्र, साखर उद्योग आणि शेतकरीहितासाठी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण आणि उत्कृष्ट नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात येत आहे.

डॉ. सुरेश भोसले यांनी ‘कृष्णा’चे अध्यक्षपद भूषवताना कारखान्याला तांत्रिक व आर्थिक शिस्त लावली. सहकार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. कारखान्याने सभासदांना नेहमीच उच्चांकी ऊसदर दिला आहे. आधुनिक उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याला भक्कम आर्थिक स्थिरता मिळवून दिली. कारखान्याला राज्यात अव्वल स्थानी पोहोचवले. त्यांच्या कर्तृत्वामुळे कृष्णा कारखान्याचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. त्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here