पुणे : शिवनगर (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना साखर उद्योगातील उल्लेखनीय व भरीव योगदानाबद्दल डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित शानदार सोहळ्यात राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या ७१ व्या वार्षिक परिषदेचे तसेच ‘शुगर एक्स्पो इंडिया’चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राजेश टोपे, श्रीमंत पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, बी. बी. ठोंबरे, एस. बी. भड, महुआ सहकारी खांड उद्योगचे अध्यक्ष एम. के. पटेल, शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, आर. व्ही. कुंभार, अरविंदकुमार रावत, संभाजी कडू-पाटील, प्रकाश नाईकनवरे, संजय खताळ, एस. एस. शिरगावकर, एस. डी. भोकरे, सी. जी. माने आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या साखर उद्योगातील कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्कारामुळे कृष्णा कारखान्याच्या कार्याची तसेच डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याचे यावेळी अधोरेखित झाले. कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, बाजीराव निकम, बाबासो शिंदे, संभाजी पाटील, बाजीराव थोरात, अरविंद पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, सत्यजित पाटील, अविनाश खरात, आनंदा खबाले, व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, माजी संचालक संजय पाटील, दीपक जाधव, संजय शेवाळे यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील नामवंत तज्ज्ञ, तंत्रज्ञ, उद्योगपती उपस्थित होते.


















