कोल्हापूर : सणासुदीमुळे साखर दरात तेजीत, किरकोळ बाजारात किलोचा दर ५५ रुपयांवर

कोल्हापूर : देशात साखर कारखान्यांच्या मागील हंगामात साखरेचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३,१०० रुपये निश्चित केला असला तरी त्यापेक्षा अधिक दराने वर्षभरात साखरेची विक्री झाली आहे. सध्या सणासुदीचा कालावधी सरू असल्याने साखरेची मागणी वाढली आहे. त्यात बाजारात साठा कमी असल्याने दर वाढत चालले आहेत. सध्या कारखान्यांकडून प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांनी साखरेची विक्री होत असून, ग्राहकांना मात्र प्रतिकिलो ५५ रुपयांनी खरेदी करावी लागत आहे.

सध्या कारखान्यांकडून साखरेची प्रतिक्विंटल ४,२०० ते ४,५०० रुपयांनी विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात ५२ ते ५५ रुपये किलोने विक्री केली जात आहे. साखर उद्योगाच्या इतिहासातील हा दर उच्चांकी असून, बाजारात साखरेचा साठा कमी आणि सणासुदीमुळे मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. कारखान्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना पडणारा दर यामध्ये प्रति किलो तब्बल १० रुपयांची तफावत दिसत आहे. कारखान्याकडून साखर खरेदी केल्यानंतर ५ टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च मिळून प्रति किलो ४ रुपये खर्च येतो. नंतर साखर किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचताना मधल्या टप्प्यांवरील व्यापाऱ्यांचे मार्जिन जोडले गेल्याने बाजारात साखर ५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे असे सूत्रांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here